नाशिक -शिवसेना नेत्यांच्या आमदाराला घोडेबजारात उभे करण्याच्या वक्तव्याचा निषेध आहे. पराभवानंतरचे वातावरण निर्मितीचे काम आतापासूनच चालू आहे. शिवसेना नेत्यांना आता तरी सुबुद्धी यावी, आमदाराला अवमानित करू नये. घोडे बाजार कुठे होतो ते शोधा. घोडे बाजार होत असेल तर सरकार तुमचे आहे हा तपास करा, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर ( BJP Leader Praveen Darekar ) यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
'राज्य शासन बळीराजा प्रती असंवेदनशील' : एक आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे एका आमदाराचा अपमान हा ३ लाख लोकांचा अपमान आहे. आम्ही राज्य सरकारचे वसुली सरकार नाव ठेवले आहे. कारण सरकारचे अधिकारी वसुली करत आहेत. त्यामुळेच महागाई वाढत आहेत. पंतप्रधान मोदी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आनले आहेत. परंतु राज्य शासन बळीराजा प्रती असंवेदनशील आहे. आता तरी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष कार्य करा, असे आवाहन दरेकर यांनी केले.