नाशिक - महापालिकेत भारतीय जनता पक्षाने ५ वर्षांत शहर विकासाच्या दृष्टीने मोठी कामे केली आहेत. त्यामुळे, पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना नेते संजय राऊत एकत्र आले तरी, महपालिकेत भाजपचीच एकहाती सत्ता येईल, असा विश्वास भाजप नेते, नाशिक निवडणूक प्रभारी गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -Nashik Accidental Death : रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू
ओबीसी आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणूक घेऊ नये
नाशिक मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक निवडणूक प्रभारी पद बहाल केल्यानंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये ढोल - ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गिरीश महाजन यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आता नाशिकची जबाबदारी माझ्याकडे असून जयकुमार रावल देखील माझ्यासोबत आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले.
मागील निवडणुकीत भाजपची सत्ता असताना गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होते. संपूर्ण नाशिकची जबाबदारी महाजन यांच्या खांद्यावर त्यावेळी असताना त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. मात्र, त्यानंतर पक्षातील अंतर्गत बदलामुळे महाजन यांच्याकडील पदभार जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता पुन्हा एकदा पदभार गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर, उत्तरप्रदेश, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काम केले.
ओबीसी आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणूक घेऊ नये. याबाबत राज्य सरकार नाकर्ते आहे. अहवाल पाठवला त्यावर सही आणि तारीख पण नाही. मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी सही पण केली नाही. एकनाथ खडसे घरी बसून कोणावरही आरोप करत आहेत. मी पैसे घेतल्याचा खडसे यांनी पुरावा द्यावा. तेव्हा तुम्हीही पक्षात होते. तुम्ही घेतले का, की तुमच्या मध्यस्तीने घेतले ते सांगा ? त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही फार महत्व नसल्याचे महाजन यांनी सांगितले.