महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP Jan Akrosh Agitation : नाशकातील विविध मुद्यांवरुन भाजपाचे महाविकास आघाडी सरकार विरोधात 'जन आक्रोश मोर्चा' - राज्य सरकार विरोधात भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षणाबाबत ( OBC Reservation ) आलेले अपयश याशिवाय नाशिकमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे सांगत भाजपाच्या वतीने आज (शुक्रवारी) जन आक्रोश मोर्चा ( BJP Jan Akrosh Agitation ) काढण्यात आला. बिडी भालेकर मैदानातून ( Bidi Bhalekar Ground Nashik ) या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

नाशिक भाजपा मोर्चा
नाशिक भाजपा मोर्चा

By

Published : Dec 10, 2021, 4:41 PM IST

Updated : Dec 10, 2021, 4:56 PM IST

नाशिक - राज्य सरकारला विविध आघाड्यांवर येत असलेले मोठे अपयश, ओबीसी आरक्षणाबाबत ( OBC Reservation ) आलेले अपयश याशिवाय नाशिकमधील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था हे मुद्दे सांगत भाजपाच्या वतीने आज (शुक्रवारी) जन आक्रोश मोर्चा ( BJP Jan Akrosh Agitation ) काढण्यात आला. बिडी भालेकर मैदानातून ( Bidi Bhalekar Ground Nashik ) या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. हे महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi Government ) नसून हे बिघाडी सरकार आहे, या सरकारला प्रत्येक आघाड्यांवर अपयश येत आहे. सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचा आरोप यावेळी भाजपाच्या वतीने करण्यात आला. मोर्चानंतर भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भाजपाचे जन आक्रोश मोर्चा



ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा

भाजपाने नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. नाशिकचे संपर्क प्रमुख माजी मंत्री जयकुमार रावल यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनामध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस काहीच करत नाही आणि काही करायचा प्रयत्नही करत नाही, उलट भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे, असा गंभीर आरोप देखील रावल यांनी केला. राज्य सरकारचा कारभार म्हणजे हा सगळा भोंगळ कारभार आहे. समाजातील कोणताही घटक राज्यांमध्ये समाधानी नाही, असे देखील त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे येत्या काळात नाशिकमधील मनपा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन त्याचाच तर भाग नसेल ना ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -Legislative Council Election : नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत भाजपचे नगरसेवक मतदान केंद्रात दाखल

Last Updated : Dec 10, 2021, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details