नाशिक - कोरोना काळात आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे मोठे योगदान राहिले असून आहे. कोरोना काळात आरोग्याची देवता म्हणजेच धन्वंतरी देवतेने दिलेली ऋतु चर्या, दिनचर्या आणि वनस्पतीचे महत्व आज समस्त जगाला कळले आहे. त्यामुळे यंदाच्या धन्वंतरी जयंतीला वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे मत नाशिकचे प्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले आहे.
आज धन्वंतरी जयंती; कोरोना काळात आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे लाभले मोठे योगदान - धनत्रयोदशी दिवाळी विशेष
आज धन्वंतरी जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. आरोग्याची देवता म्हणून धन्वंतरी देवतेस ओळखले जाते. कोरोना काळात आयुर्वेदीक उपचार पद्धतीचे मोठं योगदान लाभल्याचे अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनस्पतींचा वापर महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे यावेळी धन्वंतरी जयंतीला महत्व प्राप्त झाल्याचे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले.

धन्वंतरी पूजेच्या प्रसादामध्ये दुधाचा समावेश असतो. शरीर व मनाच्या सात्त्विक गुणांची वाढ धातूंची झीज करून काढणाऱ्या द्रव्यांचा समावेश करून नैवद्य दाखवणे आणि सर्वांना प्रसाद म्हणून देण्याची पद्धत देशात आहे. धन्वंतरीला क्षीरतिलावन या दुधाचा नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे, साळीच्या लाह्या, खवा, बत्तासे, वेलची, सुंठ व किंचित मिरी टाकून दुधामध्ये एकजीव करून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण आवश्यकतेनुसार थोडा वेळ गरम करून हा नैवद्य म्हणून धन्वंतरी दाखवण्यात येतो, तसेच सर्वांना प्रसाद म्हणूही दिला जात असल्याची माहिती डॉ विक्रांत जाधव यांनी दिली.