दिंडोरी (नाशिक) - 'एकात्मिक महिला व बालविकास केंद्र' अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील शासकीय रुग्णालयात बालमृत्युदर कमी करण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मणाऱ्या नवजात बालकांसाठी आता बेबी केअर कीटचे वाटप करण्यात येत आहे.
सोमवारी पांडाणे येथील शासकीय रुग्णालयात जन्म झालेल्या एका नवजात बालकासाठी बेबी केअर कीटचे वाटप करण्यात आले. पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्ण कल्याण समिती सदस्य संपत कड आणि वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण साबळे, डॉ. शशिकांत वाघ, सचिन कड, ज्योती गांगोडे यांच्या उपस्थितीत हे बेबी केअर कीट देण्यात आले.