नाशिक -मुंबईचे शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ यांनी मुलांसाठी अजान स्पर्धा भरवण्यासंबंधी भाष्य केले. यानंतर भाजपाने शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून घेरायला सुरुवात केली. शिवसनेने देशातील मशिदींवर लावण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरवर निर्बंध आणण्यासाठी केंद्राला अध्यादेश काढण्याची विनंती केली होती. याचा विसर शिवसेनेला पडलाय का, असा सवाल भाजपा नेत्यांनी उपस्थित केला. यावरून आता भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
अजानवरून राजकारण नको; नमाज म्हणजे 'अल्लाह की इबादत' मात्र धर्मगुरू आणि मुस्लीम बांधवांनी यावर आक्षेप घेत या राजकारणात आम्हाला कोणताही रस नसून 'अजानवरून राजकारण नको', अशी भूमिका घेतली आहे. आजनची नमाज म्हणजे 'अल्लाह की इबादत' असते. शिवसेना अजान स्पर्धा भरवत असेल तर त्यांतून चांगला संदेश जाईल, असे धर्मगुरूंनी सांगितले.
अजानची नमाज लाऊड स्पीकरवरून देण्यामागील महत्त्व
अजान म्हणजे अल्लाहची इबादत करणं होय. ज्या प्रकारे हिंदू धर्मात भगवतगीतेत चांगला समाज घडवण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. त्याच प्रकारे अजान नमाजमध्ये देखील आहे. काही लोक अजानमध्ये अकबर बादशहाचे नाव आहे म्हणून टीका करतात. मात्र अजान त्यांना अजानचा खरा अर्थ समजला नसल्याचे मुस्लीम धर्मगुरूंनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या अजान स्पर्धेचे कौतुक केले आहे. तसेच त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही, याची काळजी घेत धार्मिक उत्सव साजरे करा, असे आवाहन देखील करण्यात आले. शिवसेना आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले. यानंतप भाजपाने शिवसेनेच्या हिंदुत्त्वाला ट्रोल करत त्यावर टीका केली. सेनेने हिंदुत्त्व सोडले का, यांसारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप यामध्ये आता जुंपली आहे.