नाशिक - कोरोनाबाधित रुग्णाची विचारपूस करायला गेलेल्या महापालिकेच्या आरोग्य पथकावर त्या कोरोनाबाधित रुग्णाने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील गंजमाळ परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भुजबळ यांनी यावेळी दिला आहे. या हल्ला प्रकरणातील संशयित रुग्णाला भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोना रुग्णाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या आरोग्य पथकावर रुग्णाचा हल्ला - कोरोनाबाधित रुग्णाचा कर्मचाऱ्यावर हल्ला
विचारपूस का करता? म्हणून रुग्णाने थेट आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर तत्काळ त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला. तसेच या घडलेल्या घटनेचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही खेद व्यक्त केलाय. आरोग्य कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन आपल्यासाठी काम करत आहेत आणि त्यांच्यावरच जर असे हल्ले होतील तर हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे हल्ले करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा त्यांन दिला.

गंजमाळ येथील पंचशीलनगर मधील एका कोरोनाबाधित रुग्णाची माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेच आरोग्य पथक रुग्णाच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेले होते. यावेळी आपली विचारपूस का करता? म्हणून रुग्णाने थेट आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर तत्काळ त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाहून काढता पाय घेतला आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार देत घडला प्रकार सांगितला. प्राप्त तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रुग्णाचे घर गाठत त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संशयित रुग्णावर गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली.
या घडलेल्या घटनेचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही खेद व्यक्त केलाय. आरोग्य कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन आपल्यासाठी काम करत आहेत आणि त्यांच्यावरच जर असे हल्ले होतील तर हे चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे हल्ले करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा सूचना वजा इशारा देखील पालकमंत्र्यांनी दिला
गेल्या ३ महिन्यांहुन अधिक काळापासून आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांच्यावर हल्ले होऊ लागल्याने कर्मचाऱ्यांमध्य भीतीच वातावरण पसरले आहे. आपल्या जीवावर उदार होऊन आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य अप्रत्यक्षपणे बजावत आहे यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.