नाशिक -शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर नाशिकच्या एमजी रोड भागात ( Nashik MG Road ) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला झाल्याची घटना 18 तारखेला रात्री घडकीस आली आहे. यात कोकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत ( head injuries ) झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ( Treatment in private hospital ) आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला ( run away from spot ). मात्र, भद्रकाली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
हल्ल्याच कारण अस्पष्ट -शिवसेना पदाधिकारी निलेश (बाळा) कोकणे यांच्यावर नेमका हल्ला कशावरून झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी ( big crowd of Shiv Sainik outside hospital )केली होती. हल्लेखोरांना त्वरित अटक करा अशी मागणी यावेळी जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.