नाशिक- भारतात अभिजात कलांची एक वेगळी संस्कृती आहे. यात अनेक नृत्य प्रकारांचाही समावेश होतो. यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे भरतनाट्यम. भारतीय संस्कृतीची ओळख दाखवून देण्यासाठी नृत्य मंदिर आणि पल्लवी डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भरतनाट्यमचा विराट कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात संपन्न झाला. यात भुपाळी भजन व भक्ती संगीतावर भरतनाट्यम सादर करण्यात आले.
नाशिक: भरतनाट्यमधील 19 कलाप्रकारांचे भुपाळी भजन, भक्ती संगीतावर नृत्याविष्कार सादर - bharatnatyam nashik
भारतीय संस्कृतीची ओळख दाखवून देण्यासाठी नृत्य मंदिर आणि पल्लवी डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भरतनाट्यमचा विराट कार्यक्रम परशुराम सायखेडकर नाट्य मंदिरात संपन्न झाला. यात भुपाळी भजन व भक्तीसंगीतावर भरतनाट्यम सादर करण्यात आले.

या कार्यक्रमात राधा ही बावरी, माझे मनोरथ, शांती मंत्र, अच्युतम केशवम, ओमकार स्वरूपा ,केशव माधवा या भक्ती संगीतावर 19 प्रकारचे भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 मुली व 10 महिला कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच नृत्यांगणांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अभिनेते कांचन पगारे, किरण भालेराव, गोदाप्रेमी राजेश पंडित, ऋषिकेश गाजरे, राजा पाटेकर, श्याम लोंढे, रवी जन्नवर आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.