नाशिक - भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष ( Pitru Paksha 2022 ) म्हटले जाते. या पंधरवड्यात ज्यांचा स्वर्गवास झाला आहे ते पूर्वज वायू रुपात पृथ्वीवर ( In Pitrupaksha, the ancestors come to earth in the form of Vayu ) येतात,या दरम्यान ते त्यांच्या वंशजांकडे अन्न आणि जल याची अपेक्षा करत असतात, आणि ते घेतल्यानंतर ते तृप्त होत असतात. म्हणून या काळात तिथी नुसार श्राद्ध तर्पण विधी करून आपल्या पुर्वजांच्या आत्म्यास शांती द्यावी अशी मान्यता आहे.( Blessings will Be Received In Pitru Paksha )
पितृपक्षास हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात आले आहे -भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते.या पंधरवड्यात नागरिक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात.ज्यात कुत्रा,गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात.आणि आत्म्याची तृप्ती होते, त्यांना शांती मिळते असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथी नुसार श्राद्धकर्म करण्यात येते. जर एखाद्या पित्राची मृत्यूतिथी माहीत नसली, तर सर्वपित्री अमावस्याला ( Sarvapitri Amavasya 2022 )सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. मृत्यूनंतर जय पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही असा समज असल्याचे माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी ( Purohit Sangh President Satish Shukla ) दिली.