नाशिक -गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या चायनीजच्या तीन गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.
गोदावरी नदीकाठच्या बोटी जाळल्यानंतरचे कृत्य

गोदावरी नदी किनारी पुन्हा एकदा जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसापूर्वीच यशवंतराव महाराज पटांगणाजवळ नदी पात्रात असलेल्या बोटी एका अज्ञात इसमाने पेटून दिल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोदावरी नदी काठावरील गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या तीन हात गाड्या किरकोळ वादामुळे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
वाद घालणाऱ्या मित्रानेच गाड्यांना आग लावल्याची शक्यता
गोदावरी काठावरील तीन चायनीजच्या गाड्या किरकोळ वादातून जाळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. चायनीज गाडीचालक आणि त्याचा मित्र या दोघांचे चायनीज खाण्यावरून किरकोळ वाद झाले. त्याचवेळी चायनीज खाणाऱ्या मित्राने तुला पाहून घेईन, अशी धमकी देत तिथून निघून गेला. गाडी बंद केल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास वाद घालणाऱ्या मित्रानेच या गाडीला आग लावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, त्याच्या शेजारी असलेल्या अन्य दोन गाड्यांनीही पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत पंचवटी पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी अधिक माहिती दिली आहे.