नाशिक -लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City, Nashik) येथे पार पडत आहे. या संमेलनाच्या पूर्व संध्येला 'माझे जिवीची आवडी' या सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ झाला. यावेळी पावसाच्या सरीसोबत थंडगार वातावरणात काव्य,अभंग, गीत, संगीताने नाशिककर नागरिक मंत्रमुग्ध झाले.
Nashik Sahitya Sammelan : 'माझे जिवीची आवडी' सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला सुरवात - Nashik Sahitya Sammelan Schedule
लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Nashik ) कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी ( Bhujbal Knowledge City Nashik ) येथे होत आहे. याची सुरूवात 'माझे जिवीची आवडी' या कार्यक्रमाने झाली. ( Nashik Marathi Sahitya Sammelan )
माझ्या जिवीची आवडी कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, गायक हृषीकेश देशपांडे, विभावरी आपटे जोशी, शरयू दाते, शुभंकर कुलकर्णी, चिन्मयी सुमित, विभावरी देशपांडे यांनी संत रचनांपासून स्वातंत्रवीर सावरकर, भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, बोरकर, आरती प्रभू, ग्रेस, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांताबाई शेळके, बहिणाबाई,केशव सूत, वसंत बापट, माधव ज्युलियन, बा.सी. मर्ढेकर, नामदेव ढसाळ, ना.धो.महानोर, प्रा.कवी ग्रेस, आरती प्रभू असा एक काव्य-गीत-गझल-संगीतमय देखणा प्रवास आपल्या सादरीकरणातून नाशिककरांसमोर उभा केला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, मिलिंद कुलकर्णी, सुभाष पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, रंजन ठाकरे, दिलीप खैरे,दिलीप साळवेकर, चंद्रकांत दिक्षित, भगवान हिरे, किरण समेळ, सुनील भुरे, डॉ. वाघ, डॉ.शेफाली भुजबळ, दुर्गा वाघ यांच्यासह नाशिककर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
दि.३ डिसेंबर रोजीचे कार्यक्रम
सकाळी ८.३० - ग्रंथदिंडी कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळकवाडी, नाशिक.
सकाळी ११. ध्वजारोहण - हस्ते : प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील स्थळ : कुसुमाग्रजनगरी
सकाळी ११.३० सकाळी - ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
उद्घाटक : फादर फ्रान्सिस दिब्रिटो , संमेलनाचे मावळते अध्यक्ष विशेष पाहुणे मा. रावसाहेब कसबे
सकाळी ११.३० नाशिक - लेखक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन
उद्घाटक : प्रा. गो. तु. पाटील
प्रमुख उपस्थिती : कवी नरेश महाजन , प्राचार्य डॉ . राम कुलकर्णी
प्रदर्शन सभागृह फार्मसी बिल्डिंग
सकाळी ११.०० कलाप्रदर्शनाचे उद्घाटन
उद्घाटक : विजयराज बोधनकर
विशेष पाहुणे : ना. नीलमताई गोऱ्हे , उपसभापती
सायं. ७.३० कविकट्ट्याचे उद्घाटन
उद्घाटक : रामदास फुटाणे
मुख्य पाहुणे : न्या. जं. पा. झपाटे
प्रमुख उपस्थिती- दत्ता कराळे (आयपीएस),
बी. जी . शेखर पाटील (आयपीएस)
संयोजक : राजन लाखे , प्रसाद देशपांडे , संतोष वाटपाडे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ . वेदश्री विगळे
मध्यवर्ती हिरवळीवर
दुपारी १२ वाजता : अभिजात मराठी दालन
उद्घाटक : ना सुभाष देसाई
विशेष पाहुणे : डॉ सदानंद मोरे, अध्यक्ष साहित्य संस्कृती मंडळ.
डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ
प्रा. रंगनाथ पठारे, अध्यक्ष, अभिजात मराठी भाषा समिती प्रा. हरी नरके, समन्वयक, अभिजात मराठी भाषा समिती
मुख्य मंडप
दुपारी ४.३० ते ७.३० उद्घाटन सोहळा
प्रमुख पाहुणे मा. उद्धवजी ठाकरे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष - डॉ. जयंत नारळीकर
अध्यक्ष मावळते अध्यक्ष मा. फादर फ्रान्सिस दिब्रिटो
प्रमुख पाहुणे : मा. जावेद अख्तर
उद्घाटक : मा . विश्वास पाटील
सूत्रसंचालन : हेमंत टकले
निमंत्रितांचे कविसंमेलन
अध्यक्ष श्रीधर नांदेडकर
सूत्रसंचालन : संजय चौधरी
सहभागी कवी : दगडू लोमटे , सय्यद अल्लाउद्दीन , रवि कोरडे , प्रिया धारुरकर , मनोज बोरगावकर , वैजनाथ अनमुलवाड , भाग्यश्री केसकर , नंदकुमार बालुरे , मीनाक्षी पाटील , वाल्मीक वाघमारे , इरफान शेख , किशोर बळी , दिनकर वानखेड , अनिल जाधव , विजय शंकर ढाले , तीर्थराज कापगते , मनोज सुरेंद्र पाठक , विष्णु सोळंके , गजानन मानकर , संजय कृष्णाजी पाटील , रामदास खरे , प्रवीण बोपुलकर , गीतेश शिंदे , मनोज वराडे , वैभव साटम , गौरी कुलकर्णी , संगीता धायगुडे , विलास गावडे , डॉ . माधवी गोरे मुठाळ , अमोल शिंदे , प्रतिभा जाधव , अजय कांडर , विनायक कुलकर्णी , अविनाश चव्हाण , संजीवकुमार सोनवणे , विजय जोशी , अंजली बवे , प्रशांत केंदळे , दयासागर बन्ने , साहेबराव ठाणगे , प्रकाश होळकर , उत्तम कोळणावकर , संदीप जगताप , मिलिंद गांधी , रेखा भांडारे , विष्णु भगवान थोरे , कमलाकर देसले , राजेंद्र केवळबाई दिये , सुषमा ठाकूर , किरण काशिनाथ , दीपा मिरिंगकर , नीता शहा . लक्ष्मण महाडिक , काशिनाथ वेलदोडे , सुशीला संकलेचा आदी.
हेही वाचा -Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्यदिव्य ग्रंथदिंडीने सुरूवात