महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बलात्कार करुन होणाऱ्या नवऱ्याला अश्लील फोटो दाखवत लग्न मोडले, युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न - लग्न मोडले

लग्नाचे आमिष दाखवत मुलीला जाळ्यात फसवुन तीच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने नंतर (After the rape) तीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला ( showing the obscene photos of the husband) व त्याच्या नातेवाईकांना पाठवत लग्ण मोडण्यास (marriage was broke ) भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर त्या युवतीने आत्महत्येचा प्रयत्न करत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न (girl tried to commit suicide) केल्याचे समोर आला आहे.

girl tried to commit suicide
युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By

Published : Sep 6, 2022, 7:46 PM IST

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवत एका मुलीला जाळ्यात फसवुन तीच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने नंतर (After the rape) तीचे लग्ऩ जमत असल्याची माहिती मिळाल्या नंतर तीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला ( showing the obscene photos of the husband) व त्याच्या नातेवाईकांना पाठवत लग्ण मोडण्यास (marriage was broke ) भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो सध्या फरार आहे.


पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित विश्वनाथ साईनाथ चव्हाण यांच्यासोबत तीची 2020 पासून ओळख होती, संशयिताने लग्नाचे आमिष देत तीच्या सोबत तीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, 28 ऑगस्ट रोजी त्यांने कॉल करून तीला भेटायला बोलावले, पीडित युवतीने भेटण्यास नकार दिला तेव्हा संशयिताने युवतीच्या मोबाईलवर तसेच बहिणीच्या पतीला तसेच तीच्या भावी पतीला अश्लील फोटो पाठवले या प्रकाराने तीचे ठरलेले लग्न मोडले

या संदर्भात युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे युवतीच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या नंतर संशयित युवक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पीडित युवतीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याने युवतीचे लग्न मोडले, तसेच त्याच्या वारंवार शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून युवतीने फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details