नाशिक -त्र्यंबकेश्वर येथील शेंद्री पाडा येथे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी बांधून दिलेला लोखंडी पूल ( Iron bridge ) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने येथील महिलांना पुन्हा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याचे हंडे घेऊन जीवघेणा प्रवास ( fatal journey ) करावा लागत आहे, ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश ( administration Order ) देत येथे नव्याने पूल बांधण्याच्या सूचना दिले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हांडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर ( Social media ) मोठया प्रमाणत व्हायरल झाला होता. या व्हिडीओची दखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता. यानंतर आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसात नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
नव्याने पूल बांधण्याच्या सूचना -या पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा हंडाभर पाण्यासाठी लाकडी बाल्यावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश देत या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी सावरपाडा गावातील पुलाच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थितीत पाहणी केली आहे.