नाशिक - 'जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी आहे. लस उपलब्ध झाल्यावर ती नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचा अॅक्शन प्लॅन तयार आहे. लस साठवणुकीसाठी निकषांनुसार योग्य स्टोरेज तयार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे लोण देशभरात पसरत आहे'
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे लोण आता देशात पसरत आहे. राज्यात अन्न धान्याचा सध्या मुबलक साठा आहे. मात्र, आंदोलन आक्रमक झाले तर, अन्नधान्य पुरवठ्यावर फरक पडेल. पंजाब, हरियाणातून अनेक देशांत अन्नधान्य निर्यात केले जाते. त्यावरही परिणाम जाणवेल. यूपीए सरकारने दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. खाजगीकरण झाले तर होणारा तंटा सोडवणार कोण, हा शेतकऱ्यांचा सवाल आहे. केंद्र सरकारने, देशाच्या भल्यासाठी हा प्रश्न त्वरीत लक्ष देऊन सोडवावा,' अशी भूमिका त्यांनी भुजबळ यांनी मांडली.
हेही वाचा -मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने फडणवीस यांचा सल्ला घ्यावा - नरेंद्र पाटील