महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोलिसांसमोरच गुंडांची घरांवर दगडफेक: नागरिकांमध्ये दहशत - शिवपुरी चौक

गुंड दगडफेक करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यानंतरही गुंडानी येऊन धुमाकूळ घातल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

गुंडांची घरांवर दगडफेक

By

Published : Jun 24, 2019, 3:10 PM IST

नाशिक- गुंडांनी उत्तम नगर, शिवपुरी चौक परिसरातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत वावरत आहेत. पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी निष्क्रिय ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.


शिवपुरी चौकात तीन ते चार गुंडांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. यात एका नागरिकाच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून दरवाजे तोडले आहेत. त्यानंतर गोंधळ घालत गुंड पळून गेले. त्यामुळे घाबरलेल्या महिलांनी अंबड पोलिसात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी आले, मात्र पोलिसांसमोर गुंडांनी पुन्हा धुमाकूळ घातला. पुन्हा दगडफेक केली आणि धूम ठोकली. नागरिकांसमोर गुंडांनी धुमाकूळ घातल्यानंतर पोलिसांसमोर ही तोच प्रकार झाल्याने पोलिसांचा वचक संपल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


हेच गुंड चोरटे असल्याचे नागरिकांचा आरोप


या चोरट्यांबद्दल जे नागरिक तक्रार करतात, त्या नागरिकांच्या घरावर असे हल्ले होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे गुन्हेगारीबद्दल कुणीही तक्रार करायची नाही, त्यांना विरोध करायचा नाही. विरोध केला, तर तक्रारदारांवर हल्ले किंवा घरावर दगडफेक होते. त्यामुळे सिडको भागातील गुन्हेगारी वाढत आहे. अंबड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सिडको परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details