नाशिक: हनुमानाचे जन्मस्थळ कोणते यावरून वाद ( Argument Hanuman birthplace ) सुरू असतांना, चेन्नई येथील सीपीआर इन्व्हेस्टमेंट सेंटरच्या शासकीय वेबसाईटनुसार नाशिकचे अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे म्हटले आहे. एकीकडे वेगवेगळ्या पुराणात हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत वेगवेगळ्या आख्यायिका असल्याच्या दिसून येत आहे. त्यामुळे हनुमानाच्या जन्मस्थळ नेमके कोणते याबाबत अद्याप उत्तर मिळू शकत नाही.
नाशिकजवळील अंजनेरी हा वाद पुरावा आधारित सोडवण्यासाठी नाशिकला शास्त्रार्थ सभा पार पडली. परंतु या सभेमध्ये आसनव्यवस्था पासून सुरू झालेला वाद बूम उगारणे पर्यंत पोहोचला. अखेर पोलिसांना मध्यस्ती करावी लागली, या सभेमध्ये वाद-प्रतिवाद होऊन दोन्ही पक्षांनी पुराणातील दाखले दिले. वाल्मिकी रामायणात उल्लेख असलेल्या दाखल्यानुसार किष्किंधा हेच श्री हनुमानाचे जन्मस्थळ ( Kishkindha is birthplace of Lord Hanuman ) असल्याचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. मात्र आता चेन्नईतील सीपीआर एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटरच्या ( Chennai CPR Environment Education Center ) शासकीय वेबसाइट नुसार नाशिकचे अंजनेरी हेच हनुमनाचे जन्मस्थळ असल्याचे दाखले गोदाप्रेमी देवांग जानी यांनी म्हटले आहे.