महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Crime News : नाशिकच्या युवकाचे लडाखमध्ये अपघाती निधन; सहलीला मित्रांसह बुलेटवरून युवकाचा प्रवास - Travels on Bullet

नाशिक येथील पोलीस निरीक्षक सतीशचंद्र जाधव यांचा मुलगा नयन याचा लडाख येथे अपघात होऊन मृत्यू झाला. मित्रांसह बुलेट घेऊन लडाख येथे सहलीली गेलेला नयन सतीशचंद्र जाधव ( Nayan Satishchandra Jadhav ) याच्यावर काळाने घाला घातला. मित्रांसह अमृतसरहून ते काश्मीरमध्ये लडाखकडे जाताना नयनच्या बुलेट आणि अज्ञात वाहनाचा अपघात झाला. नयनला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना ( Dwarka Amardham ) त्याचा मृत्यू ( Accidental death ) झाला.

Death Nayan Satishchandra Jadhav
मयत नयन सतीशचंद्र जाधव

By

Published : Jul 23, 2022, 2:27 PM IST

नाशिक : मित्रांसह बुलेट घेऊन लडाख येथे सहलीला गेलेल्या गंगापूर राेडवर राहणाऱ्या तरुण उद्याेजकाचा अपघाती मृत्यू झाला. या सहलीवरून नाशिकला परतताच त्याचा विवाह ठरविला जाणार हाेता. मात्र, त्या आधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नयन सतीशचंद्र जाधव ( वय ३२. रा. काळेनगर, गंगापूर रोड, नाशिक ) असे मृत तरुण उद्याेजकाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह काश्मीरहून विमानाने मुंबई येथे आणण्यात येणार असून, द्वारका अमरधाम ( Dwarka Amardham ) येथे आज अंत्यविधी होणार आहे.

अशी घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार नयन जाधव यांच्यासह नाशिक शहरातील तीस युवक प्रत्येक बुलेट वाहनाने २७ जूनला सहलीसाठी नाशिकहून अमृतसरकडे रवाना झाले होते. अमृतसरहून ते काश्मीरमध्ये लडाखकडे जाताना रस्त्यात नयन जाधव यांच्या बुलेट व अज्ञात वाहनाचा अपघात झाला. जखमी नयनला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. निवृत्त पोलिस निरीक्षक सतीशचंद्र जाधव यांचा नयन हा मुलगा आहे. नयनचा मोठाभाऊ गौरव हा इंजिनिअर असून, तो पुणे येथे तर दुसरा भाऊ कुणाल हा पुणे येथे टेक महिंद्र कंपनीत नोकरीस आहे. नयन जाधव यांचा अंबड औद्योगिक वसाहतीत कंट्रोल पॅनल तयार करण्याचा कारखाना आहे.

हेही वाचा :Lingya Ghat in Pune Mulshi Taluka : लिंग्या घाटातील सुळक्यावर चढून पर्यटकांचा जीवघेणा फोटोशूट

ABOUT THE AUTHOR

...view details