महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यातील 5 केंद्रांवर 18 वर्ष पूर्ण केलेल्यांना मिळणार लस.. - corona vaccination above 18 years

अठरा पूर्ण केलेल्यांना उद्यापासून (दि.१) कोरोना लस दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्र सुरु केली जाणार आहे. नाशिक महापालिका दोन, ग्रामीण भागात दोन व मालेगाव महापालिला हद्दित एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी दहा हजार लसीचा स्टाॅक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लसीचा तुटवडा लक्षात घेता सध्या मोजकीच लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

corona vaccination
corona vaccination

By

Published : Apr 30, 2021, 10:34 PM IST

नाशिक - अठरा पूर्ण केलेल्यांना उद्यापासून (दि.१) कोरोना लस दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात पाच केंद्र सुरु केली जाणार आहे. नाशिक महापालिका दोन, ग्रामीण भागात दोन व मालेगाव महापालिला हद्दित एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी दहा हजार लसीचा स्टाॅक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. लसीचा तुटवडा लक्षात घेता सध्या मोजकीच लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नाशिक लसीकरण
लसीच्या तुटवड्यामुळे मोजकीच लसीकरण केंद्र सुरू -
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून तो रोखण्यासाठी 1 मे पासून देशात 18 वर्षापुढील सगळ्यांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यानेही लसीकरणाची तयारी सुरु केली. त्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर लसीकरणासाठी नोंदणी सुरु आहे. मात्र, महाराष्ट्राला केंद्राकडून लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने 1 मे पासून 18 वर्षापुढिल प्रत्येकाला लस मिळेल का याबाबत शंका होती. मात्र, उपलब्ध लसीचा नगण्य संख्या लक्षात घेता मोजक्याच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानूसार नाशिक जिल्ह्यात सर्वत्र यासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारले जाणार नाहीत.
रात्री उशीरा दहा हजार लसीचा स्टाॅक उपलब्ध -
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार फक्त जिल्ह्यातील पाच ठिकाणी ही लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे. त्यासाठी रात्री उशिरा दहा हजार लसीचा स्टाॅक उपलब्ध झाला आहे. सद्यस्थितीत 45 वर्ष पूर्ण केलेल्यांचे लसीकरण सुरु आहे. मात्र लसीचे पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील लसीकरणाची गती मंदावली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details