नाशिक : गाडीला ओव्हरटेक का केले असा जाब विचारत एका महिलेने तिच्या साथीदारांसह शहर बसच्या चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. मारहाणीचा हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बसने ओव्हरटेक केल्याने महिलेची साथीदारांसह चालक-वाहकाला मारहाण - women beats city bus driver and conductor
गाडीला ओव्हरटेक का केले असा जाब विचारत एका महिलेने तिच्या साथीदारांसह शहर बसच्या चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. मारहाणीचा हा प्रकार बसमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
![बसने ओव्हरटेक केल्याने महिलेची साथीदारांसह चालक-वाहकाला मारहाण बसने ओव्हरटेक केल्याने महिलेची साथीदारांसह चालक-वाहकाला मारहाण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13629616-43-13629616-1636873678295.jpg)
बसमध्ये घुसून मारहाण
याविषयी सविस्तर वृत्त असे की, रविवारी म्हसरुळच्या बोरगडवरून चालक गोकुळ काकड हे बस क्रमांक एमएच 15 जीव्ही 7870 ही बस नाशिककडे घेऊन निघाले असताना बोरगड परिसरातील कासार माता चौकात एका महिलेने तिच्या साथीदारांसह बस अडविली. यावेळी ही महिला साथीदारांसह बसमध्ये शिरली आणि ‘आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले’ असा जाब विचारत तिने चालकाशी वाद घालून मारहाण केली. यावेळी वाहक समजावत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीची संपूर्ण घटना बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अनाेळखी महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तसेच सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आल्याचे कळते. याबाबत पुढील तपास पीएसआय वाघ हे करीत आहे
सिटी बस समाजकंटकांकडून लक्ष्य
नाशिक मनपाची नव्याने सुरु झालेली सिटी लिंक ही शहर बस सेवा सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहे. मात्र काही समाजकंटक नव्या बसेसना लक्ष्य करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी सातपूर येथे एका नव्या बसची ताेडफाेड करण्यात आली हाेती.