महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Wife murder Wadala चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या - पत्नी हत्या वडाळा परिसर नाशिक

शहरातील वडाळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक wife murder by husband in wadala area in nashik घटना घडली आहे. या घटनेनंतर इंदिरा नगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

wife murder by husband in wadala area in nashik
पत्नी हत्या वडाळा परिसर नाशिक

By

Published : Aug 16, 2022, 6:53 AM IST

नाशिकशहरातील वडाळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर इंदिरा wife murder by husband in wadala area in nashik नगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

हेही वाचाShravan 2022 त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील वडाळा परिसरात Wife murder Wadala राहणारा रिजवान पठाण हा त्याची पत्नी व दोन मुलांसह राहत होता. रिजवान हा पत्नी निनाद पठाण हिला कायम चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत होता. मात्र मुलांसाठी निनाद ही पतीचा अन्याय सहन करत होती. मात्र 15 ऑगस्टला दुपारच्या सुमारास पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला. यावेळी रिजवान याने पत्नी निनाद हिला बेदम मारहाण करत मोबाईलच्या चार्जरच्या वायरच्या सहायाने तिचा गळा आवळून तिची हत्या केली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिजवान पठाणला इंदिरा नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माझ्या आई-वडिलांमध्ये कायम भांडणे होत होती. वडील आईला एका रूममध्ये घेऊन तिला मारहाण करत असे. अशात मी आणि माझी बहीण सोडवण्यासाठी गेल्यावर ते आम्हाला देखील मारण्याची धमकी द्यायचे. त्यामुळे माझी आई कायम दडपणाखाली असायची अशी माहिती मृत आईच्या मुलाने दिली आहे.

हेही वाचाIndian Independence Day गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर येथे उभारावे स्मारक

ABOUT THE AUTHOR

...view details