महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kid Death in Nashik : ट्रॅक्टरवरून पडून पाच वर्षे मुलाचा चालक पित्यासमोरच झाला मृत्यू - Gangapur Police Thane

ट्रॅक्टरवरून खाली पडल्यानंतर पाच वर्षेच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याचा धक्कादायक घटना ,नाशिकच्या ध्रुवनगर गंगापूर रोड (Nashik Dhruvnagar Gangapur Road) येथे घडली असून, ट्रॅक्टर चालकांवर मनुष्यवधासह ,मोटर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

death of a five-year-old boy
वर्षेच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : Jul 5, 2022, 9:50 AM IST

नाशिक-शहरातील ध्रुवनगर गंगापूर रोड येथे ट्रॅक्टरवरून खाली पडल्यानंतर पाच वर्षे मुलाचा मृत्यू (The unfortunate death of a five-year-old boy) झाला. याप्रकरणी चालका विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघव शिंदे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास दिनकर विश्वनाथ शिंदे हे त्यांच्या ट्रॅक्टरला पाण्याची टाकी जोडून मुलगा राघव शिंदे ( वय 5 ) ह्याला शेजारी बसून ट्रॅक्टर वेगाने चालवत घेऊन जात होते. यावेळी त्यांचा मुलगा राघव याचा तोल जावून तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडला. त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे बाजूचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चालक दिनकर शिंदे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधासह मोटर कायद्यांतर्गत गंगापूर पोलीस ठाण्यात ( Gangapur Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक(Sub-Inspector of Police ) एस. व्ही. शेंडकर हे पुढील तपास करत आहे.

सोमवारी पुण्यातील अपघातात तीन जणांचा मृत्यू-पुण्यातील पिरंगुटनजीक ( Pirangutan in Pune ) असलेल्या लवळे फाटा ( Accident Near Lovele Fata ) येथे सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास एक ट्रक व दुचाकी याचा अपघात झाला असून,या अपघातामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, एक व्यक्ती जखमी झालेली आहे. या भीषण अपघातात 10 महिन्यांच्या ( 10 month old Child dies ) चिमुकल्यासह आईचाही दुर्दैवी मृत्यू ( unfortunate death of mother ) झाला. आणखी एका दुचाकी चालकाला धडक बसल्याने त्याचाही यामध्ये मृत्यू झाला असून, एक जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हेही वाचा-Three killed in Accident Kolhapur : पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघात; हायवेवर बंद कंटेनरमुळे तिघांच्या मृत्यू

हेही वाचा-Terrible Accident in Pune : पुण्यातील लवळे फाट्यावर भीषण अपघात; अपघातात 10 महिन्यांच्या चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details