नाशिक- दारुची दुकाने उघडावी अशी अनेक तळीरामांची मागणी होती. अखेर शासनाने ही मागणी पूर्ण करत दारूची दुकाने सशर्त उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यदुकानदारांनी काल (दि.3 मे) सायंकाळी दुकानाबाहेर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी तसेच तळीरामांना उनाचा त्रास होऊ नये म्हणून मंडपही फभारले होते. त्यानंतर आज सकाळी मद्यप्रेमींनी पहिला लाभार्थी मीच ठरणार, अशी शर्यतच लावल्याचे चित्र दिसून आले. कारण, सकाळपासून मद्यविक्री केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र जीवनावश्यक सुविधा वगळता टाळेबंदी करण्यात आली होती. साधारण पन्नास दिवसांपासून दारु न मिळाल्याने मद्यप्रेमी व्याकुळ झाले होते. केंद्र सरकारने रेड झोनमध्येही वाईन शॉप सुरू करण्याबाबत निर्देश असले आहे. त्यावरून नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू झाली. वाईन शॉपी मालकांनी वाईन शॉप बाहेर सुरक्षित अंतर ठेवून ग्राहक उभे राहतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.