नाशिक : आजच्या धावपळीच्या जीवनात वयाच्या पंचाहत्तरी नंतर विना आधार चालणे कठीण होते, मात्र यावर मात करत वयाच्या 77 व्या वर्षी नाशिकच्या जयंती किशोर काळे ( Jayanti Kishore Kale ) यांनी आपल्या कौशल्याद्वारे 23 राज्यस्तरीय मास्टर्स एकव्हटीक चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत स्वीमिंगच्या सर्वप्रकारात आपली चुणूक दाखवत 3 सुवर्ण 2 रौप्य पदके पटकावली आहे. ( won 3 Golds In Swimming Nashiks ) आवड,जिद्द,सातत्याच्या जोरावर वयाच्या 77 वर्षी नाशिकच्या जयंती काळे यांनी नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ( Competition Held At Nanded ) तब्बल 3 सुवर्ण दोन रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहेत. तर 77 वर्षी त्यांनी पाण्यात लावलेली सूर सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
जिद्दीतून पटकावले अनेक पारितोषिक :जयंती काळे यांना दुसरीचे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यात पोहण्याची आवड निर्माण झाली होती. विहीर, नदी या ठिकाणी त्या तासनतास पोहत असत, याच आवडीतून निर्माण झालेल्या जिद्दीतून त्यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक पारितोषिक पटकावले आहे, जस जसे वय वाढत गेले तस तसे स्विमिंग बद्दल त्यांची आवड अधिकच वाढत गेली, त्यामुळे वयाच्या 77 व्या वर्षी देखील त्यांनी स्विमिंगचा सराव नियमितपणे सुरू ठेवला आहे. रोज सकाळी साडेसहा वाजता त्या नाशिकच्या वीर सावरकर जलतरण तलारावर सराव करतात.