महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Police Station Unauthorized : नाशिकमधील 72 पैकी 65 पोलीस चौक्या अनधिकृत; आयुक्त पांडये

नाशिकमधील 72 पैकी 65 पोलीस चौक्या अनधिकृत ( Nashik Police Station Unauthorized ) असल्याचा गौप्यस्फोट आयुक्त दीपक पांडये यांनी केला ( Police Commissioner Deepak Pandey ) आहे. राजकीय दबावामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांची मान्यता न घेता चौक्या सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

Deepak Pandey
Deepak Pandey

By

Published : Mar 17, 2022, 5:18 PM IST

Updated : Mar 17, 2022, 5:28 PM IST

नाशिक -नाशिकमधील 72 पैकी 65 पोलीस चौक्या अनधिकृत ( Nashik Police Station Unauthorized ) असल्याचा गौप्यस्फोट आयुक्त दीपक पांडये यांनी केला ( Police Commissioner Deepak Pandey ) आहे. राजकीय दबावामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांची मान्यता न घेता चौक्या सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. पुढील तीन महिन्यात या चौक्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही पांडये यांनी दिले आहे.

दारू पिणारे 'ते' पोलीस निलंबित

डीके नगर पोलीस ठाण्यातील ओल्या पार्टीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर आयुक्त दीपक पांडये यांनी संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. पोलीस असे अशोभनिय काम करतातच कसे? असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस चौक्यांचा आढावा घेणार

या प्रकरणाची चर्चा झाल्यावर शहरातील आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. याबाबत नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. पोलिसांनी तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांनाच वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. दुपारी पोलिसांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर आयुक्तांनी तातडीने या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच, शहरातील सर्वच पोलीस चौक्यांचा आढावा घेऊन अनावश्यक चौक्या बंद करण्यात याव्या. कोणत्याही चौकीत नियमबाह्य वर्तन चालणार नाही, अशी तंबीही आयुक्तांनी दिली आहे.

आयुक्त पांडये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

काय आहे प्रकरण?

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादोजी कोंडदेव पोलीस चौकीत एक तक्रारदार तक्रार करण्यासाठी गेले. काही टवाळखोर दारु पिऊन त्रास देत असल्याची त्यांची तक्रार होती. पण, ते तक्रार ज्यांच्याकडे गेले, ते पोलिसच टेबलवर बाटल्या मांडून प्यायला बसलेले दिसले. तक्रारदारांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. तेव्हा पोलिसांनी तेथून धूम ठोकली. यावेळी मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी एका नागरिकाला मारहाण केल्याचा आरोप देखील आहे.

हेही वाचा -Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम दिलासा, पुढील सुनावणी सोमवारी होणार

Last Updated : Mar 17, 2022, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details