नाशिक - कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मोठी आहे. यातच पोलीस तर २४ तास रस्त्यावर उतरून काम करत आहेत. रणरणत्या उन्हात उभे राहून कर्तव्य बजावत सर्वांची काळजी घेत आहेत. त्यांच्याविषयी सामाजिक बांधिलकी जपत नाशिक पोलिसांसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि 'दातार कॅन्सर जेनेटिक्स' यांच्याकडून अत्याधुनिक मनगटी घड्याळ देण्यात आली आहेत.
अक्षय कुमारकडून नाशिक पोलिसांना ५०० अत्याधुनिक घड्याळ - nashik police modern watches
नाशिक पोलिसांसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि 'दातार कॅन्सर जेनेटिक्स' यांच्याकडून अत्याधुनिक मनगटी घड्याळ देण्यात आली आहेत.
यामुळे पोलिसांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होणार आहे. हे घड्याळ रोजच्या रोज आपल्या शरिराचा रक्तदाब, शरिराचे तापमान, आपण किती चाललो आणि आपल्या किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबतची माहिती देते. त्यामुळे साहजिकच सद्याच्या परिस्थितीत होणारा त्रास हा तत्काळ लक्षात येणार आहे.
विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरलेत, त्यांनी किती कामे केलीत, याचेही मोजमाप करण्यास मदत मिळेल. गोकी या कंपनीचे हे घड्याळ आहे आणि आता आयुक्तालयातील २२५ अधिकारी आणि ३ हजार ५ पोलीस कर्मचाऱ्यांना हे घड्याळ मिळणार असल्याने याचा चांगला उपयोग होणार आहे.