नाशिक - गंगापूर धरण परिसर निषिद्ध क्षेत्रात सायकलिंग करणे महागात पडले असून ५० हून अधिक सायकली जलसंपदा विभागाने जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
या घटनांमुळे कारवाई
गंगापूर धरण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र आहे. तसेच मागील काही वर्षात धरणात बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सकाळ व सायंकाळच्यावेळी गंगापूर धरणावर सायकिलस्टची गर्दी होत असून या ठिकाणी फेरफटका मारण्यास ते पसंती देतात. मात्र धरणाची सुरक्षा बघता ही कारवाई करण्यात आली आहे.
५० हून अधिक सायकल जप्त, नागरिकांवर दंडात्मक कारवाई
धरण परिसरात येऊन त्यानंतर या ठिकाणी आंघोळीचा आनंद घेऊन विनाकारण पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत बुडून मृत्यू झाल्याचा घटना होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरण परिसरामध्ये बंदी असतानाही विनाकारण या ठिकाणी सायकलिंग करून नियमांचा भंग करणे आणि विनापरवाना या ठिकाणी आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. त्यानुसार आज सकाळी गंगापूर धरण परिसरामध्ये विनाकारण प्रवेश करून सायकलिंग करणाऱ्या ५० जणांविरोधात कारवाई करून त्यांच्या सायकली जलसंपदा विभागाने जप्त केल्या आहेत.
हेही वाचा -राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत