महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जिल्हा परिषदेअंतर्गत ३ हजार २०७ कर्मचार्‍यांची भरती करणार -डाॅ. भारती पवार - employees Zilla Parishad

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेअंतर्गत केंद्राची कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने 3207 आरोग्य सेवकांची भरती केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी सांगितले आहे. त्या नाशिक दौर्‍यावर आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

डाॅ. भारती पवार
डाॅ. भारती पवार

By

Published : Sep 7, 2021, 3:54 AM IST

Updated : Sep 7, 2021, 12:21 PM IST

नाशिक - महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेअंतर्गत केंद्राची कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने 3207 आरोग्य सेवकांची भरती केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनी सांगितले आहे. त्या नाशिक दौर्‍यावर आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

'कोरोनाच्या वातावरणात 597 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते'

2610 सेवा कर्मचाऱ्यांना परवानगी मिळाली होती. यामध्ये 597 नाव वगळण्यात आले होते. मात्र, या सर्व सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या आरोग्य सेवकांना पुन्हा भरती प्रक्रिया समाविष्ट केले जाईल. तसेच, कोव्हीडच्या वातावरणात 597 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. काही पीएसीला कमी डिलिव्हरी झाल्याने, या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेतून वगळण्यात आले होते. अशी माहिती पवार यांनी यांनी यावेळी दिली आहे. सांगितले आहे.

'बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का?'

कोरोना नियम पाळून सण साजरे करायला पाहिजेत. गणेशोत्सवाचा उद्देशच प्रबोधन करणे आहे. कोरोनाबाबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी, असही पवार यावेळी म्हणाल्या आहेत. बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत राज्याने मंदिर उघडण्याबाबत केंद्रावर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घ्यावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

'महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर'

कोरोनामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता राज्य सरकारने महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम केले पाहिजे. कोणत्याही अधिकाऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकार याबाबत काहीच करत नाही, याचा खेद असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी असल्याचे सांगून त्या म्हणाले की सरकार माता-भगीनींच्या सुरक्षेकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

Last Updated : Sep 7, 2021, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details