नाशिक -अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये आग लागल्याने 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे. यामध्ये नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासह मालेगाव रुग्णालय तसेच जिल्ह्यातील 18 ग्रामीण व व उपजिल्हा रुग्णालयाचे मागील दोन वर्षापासून फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आग प्रतिबंधक उपकरणावर जिल्ह्यातील 18 रुग्णालये -
राज्यातील विविध ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर फायर ऑडिटचा प्रश्न समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी केवळ दोनच फायर ऑफिसर असल्याने ऑडीटचे काम वेळेत होत नसल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून रोज शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी गर्दी करतात. या रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे विविध व्यवस्था असायला हव्यात. परंतु, या रुग्णालयात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रथम उपाय म्हणून वापरली जाणारी आग प्रतिबंधक उपकरणाशिवाय कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णालयासाठी फायर सेफ्टी निधीची अडचण असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयायात शॉर्टसर्किटच्या घटना वाढल्या -