इगतपुरीतील १५ शालेय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
इगतपुरी (Igatpuri) तालुका कोरोनामुक्त (Corona free) झाला असतानाच मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील (Residential Ashram School) १५ विद्यार्थ्यांना (15 students tested positive for corona) कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे.
नाशिक: वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर १५ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ह्या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्य यांनी भेट देऊन वैद्यकीय पथकाला खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माळी यांनी तातडीने कार्यवाही करून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली.आरोग्य सहाय्यक संजय राव, आशा कार्यकर्त्याांच्या पथकाने कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत.