महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक शहरात पूर परिस्थितीमुळे 144 कलम लागू

नाशिक पोलीस आयुक्तालय मार्फत नाशिक शहरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

होळकर पुलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

By

Published : Aug 4, 2019, 11:27 PM IST

Updated : Aug 4, 2019, 11:43 PM IST

नाशिक- जिल्ह्यात जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

रविवार असल्याने होळकर पुलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

जिल्ह्यातील परिस्थितीच्या अनुषंगाने पुलावर, नदीकिनारी, धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, पुरात पोहणे, पूर पाहण्यासाठी गर्दी करणे, त्याबरोबरच प्रशासनाची मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण करणे, धोकादायक वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास प्रशासनाचा विरोध करणे यामुळे जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते. म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालय मार्फत या सर्व कार्यक्षेत्रात 144 कलम लागू करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

रविवार असल्याने होळकर पुलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अनेक तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी देखील अशा परिस्थितीत पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन ईटीव्ही भारत कडून करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 4, 2019, 11:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details