नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होतं असला तरी प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून यात मागील चार महिन्यात 12 हजार लहान बालकांना कोरोना झाल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हे प्रमाण दुप्पट असल्याचे शासकीय अहवालातून समोर आलं आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात असल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नाशिक जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. परंतु पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देखील बालकांना कोरोनाची लागण झाली होती, प्राप्त अहवालानुसार, दुसऱ्या लाटेत म्हणजे 16 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 0 ते 12 वयोगटातील 12 हजार 282 बालकांना कोरोनाची बाधा झाली. यात 6 हजार 719 मुलं आणि 5 हजार 463 मुलींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 13 ते 25 वर्ष वयोगटातील 43 हजार 745 बाधित झालीं आहेत.
वय । 27 मार्च ते 15 फेब्रुवारी । 16 फेब्रुवारी पासून पुढें
0 ते 12 - 6121 - 12282
13 ते 25 - 17054 - 43745
एकूण - 23175 - 56027
हेही वाचा -अपोलो हॉस्पिटल्समध्ये 'स्पूटनिक व्ही'चे लसीकरण; 1195 रुपये प्रति डोसची किंमत!
बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता जिल्ह्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून नुकताच या पथकाने जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला. यात बालकांवर करावे लागणारे उपचार, सुविधा आदी बाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही सूचनाही करण्यात आल्या आहेत.