नाशिक : येथे घडलेल्या खाजगी बस अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला (Nashik bus burning incident) होता. 30 प्रवाशांची क्षमता असताना सुद्धा 48 जण या बसमध्ये प्रवास करत होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी (Nashik bus burning case body identification) प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली. अखेर डीएनए चाचणीचा (DNA test for body identification) वापर करून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात प्रशासनाला (administration efforts for burned body identification) यश आले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे; मात्र असं असलं तरी खाजगी बस ट्रॅव्हल्समध्ये व्यवसायिक वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसवून अवैध वाहतूक करत असल्याचं समोर आलं आहे. आता प्रवाशांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाराही प्रवाशांची ओळख पटली-यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसने (7 ऑक्टोबर, शनिवारी ) पहाटे गुजरातहून कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने बसला आग लागून यात 12 प्रवाशांच्या बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. यात बहुतेक मृतदेहाचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले होते. अखेर जिल्हा प्रशासनाने या सर्वांची डीएनए चाचणी केल्यानंतर सर्व 12 मृतदेहांची ओळख पटली आहे.
म्हणून करावी लागली डीएनए चाचणी -बस अपघातात जळालेले 12 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यातील बहुतांश मृतदेहाची ओळख पटवणं अवघड होतं. त्यानंतर आम्ही त्यांची डीएनए चाचणी करण्याचे ठरवलं. अशात त्यांच्या कुटुंबातील मुलगा आणि आई-वडिलांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे गुणसूत्र तपासण्यात आले. सुरुवातीला नऊ मृतदेहांची ओळख पटली. मात्र तीन मृतदेह अक्षरशः कोळसा झाले होते. यात सुद्धा आम्ही डीएनए चाचणी यशस्वीरित्या करून तीनही मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
डीएनए चाचणी कशी करतात -गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेमध्ये 46 गुणसूत्र असतात. यात मानवीू रंगरूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, आकार, कातडीचा रंग, डोळ्यांचा रंग हे सर्व महत्त्वाचे घटक असतात. हे घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्र तंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्तीच्या माता-पित्यांची ओळख निश्चित करता येते.