महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : लॉन्समध्ये सुरू होती बनावट दारूनिर्मिती, 1 कोटी मुद्देमालासह 12 अटकेत

बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा ते पंधरा हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लीटर स्पिरीट, दोनशे लीटरचे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 5 ते 10 हजार, देशी दारू बनवण्याचे साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत बारा जणांना ताब्यात घेतले आहे.

नाशिक बनावट दारू
नाशिक बनावट दारू

By

Published : Oct 12, 2021, 3:06 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील चांदोरी गावातील एक लॉन्सवर छापा टाकून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने लॉन्समधील अवैध दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करत एक कोटी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 12 जणांना अटकही करण्यात आली आहे.

पोलीस फौजफाट्यासह छापा

ज्या ठिकाणी साखरपुडा, लग्नकार्य यासारखे शुभकार्य होतात, त्या लॉन्समध्ये देशी बनावटी दारूचा अवैध कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटिल यांना मिळाली होती. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ पोलीस फौजफाट्यात निफाड येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयनराजे लॉन्सवर छापा टाकला.

भाड्याने दिले होते लॉन्स

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्यावर्षी मार्च महिन्यात सुरू झाला. त्याचा थेट परिणाम लग्न समारंभ यावर पाहायला मिळाला. गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून साखरपुडा, लग्नकार्यावर बंदी आल्याने मंगल कार्यलय, लॉन्सचे मेंटेनन्स काढणे कठीण झाल्याने येवला तालुक्‍यात कांदा साठवण्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने दिल्याचेही वृत्त आले. मात्र निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्क दारू बनवण्यासाठी लॉन्स दिल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हे लॉन्स भाड्याने दिल्याने मला याची कल्पना नव्हती, असे मालक अंबादास खरात यांनी म्हटले आहे.

1 कोटीचा मुद्देमाल जप्त, 12 अटकेत

यावेळी येथून बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा ते पंधरा हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लीटर स्पिरीट, दोनशे लीटरचे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे 5 ते 10 हजार, देशी दारू बनवण्याचे साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत बारा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details