नाशिक :नाशिकमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( Raining Incessantly Past Six Days ) आहे. अशात ओले कपडे परिधान केल्याने 10 ते 12 टक्क्यांनी त्वचाविकाराचे ( Increase Skin Disorders 10 to 12 Percent ) रुग्ण वाढले ( Increase Skin Disorders ) आहे. दमट आणि ओले कपडे घालणे नागरिक जोपर्यंत बंद करीत नाहीत. तोपर्यंत त्वचाविकाराच्या समस्या थांबणार नाहीत, असे डॉ. वृषाली व्यवहारे ( Doctor Vrushali Vyavhare ) यांनी सांगितले आहे. नाशिकमहानगरपालिकेत मागील दहा दिवसांत तापसदृश आजाराचे 3000 रुग्णांची नोंद झाली आहे. ( Epidemics rising in Nashik ) ( Doctors urged to wear clean and dry clothes )
नाशिकमध्ये साथीचे आजार बळावले : ( Epidemics on the rise in Nashik ) नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साथीचे रोग, तसेच कीटकजन्य आजाराने तोंड वर काढले ( Insect-Borne Diseases on Rise ) आहे. तसेच, पावसाळ्याच्या पाण्याच्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या डासांमुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 49 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. अशात आता नागरिक दमट आणि ओले कपडे परिधान करीत असल्याने त्यांना खरूज, नायटा, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेवर फोड येणे, गजकर्ण अशा प्रकारच्या त्वचा विकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत.
साथीच्या आजारात सर्व वयोगटातील रुग्ण : नाशिकमध्ये पावसाची मुसळधार चालू असतानाच आता ह्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेत साथीच्या आजारात सर्व वयोगटातील रुग्ण वाढत असल्याची नोंद आहे. हे विकार केवळ मोठ्यांना नाहीत, तर लहानांमध्येदेखील आढळत आहेत. जोपर्यंत नागरिक ओले कपडे अंगावर कायम ठेवणे थांबवत नाही, तोपर्यंत त्वचाविकारांमधील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने तातडीने निदान साथीच्या रोगांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे.