नाशिक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना राज्य शासनाने सुरू केली. या योजनेला ज्येष्ठांचा उदंड प्रतिसाद लाभला. एकट्या नाशिकमध्ये अवघ्या पाच दिवसात दहा हजार ज्येष्ठ नागरिकांनी बसमधून मोफत प्रवासाचा आनंद घेतलाय. विशेष म्हणजे प्रवास करणाऱ्यांमध्ये अर्ध तिकिटाची योजना असलेल्या 65 वर्षांवरील ज्येष्ठांपेक्षा 75 वयावरील ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
13 डेपोमध्ये योजनेचे लाभार्थी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी राज्य शासनाने अमृत ज्येष्ठ नागरिक योजनची घोषणा केली होती,पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला हिरवा कंदील दिला होता.यानंतर 26 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष योजनेला सुरुवात झाली,पहिल्या दिवसांपासून नाशिक मधील जेष्ठ नागरीकांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला. नाशिक जिल्ह्यातील 13 डेपोमध्ये योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिसून आले. अवघ्या पाच दिवसात तब्बल 10 हजार 700 ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. तर 65 ते 75 वर्ष दरम्यान 50 टक्के तिकिटाचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या 80 हजार इतकी आहे.