नांदेड- काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचे पिल्लु आहे, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली. भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मुखेड येथे आल्या होत्या.
काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद, तर राष्ट्रवादी हे काँग्रेसचे पिल्लू - पंकजा मुंडे - राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेसांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात 'डिव्हाईड अॅन्ड रूल' (फोडा आणि राज्य करा) पॉलिसी राबवली. काँग्रेसने देशात सत्तेच्या माध्यमातून व्यवहार केला.

मुखेड येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेसांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात 'डिव्हाईड अॅन्ड रूल' (फोडा आणि राज्य करा) पॉलिसी राबवली. काँग्रेसने देशात सत्तेच्या माध्यमातून व्यवहार केला. त्यामुळे देशातील जनतेचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. पहिल्यांदा त्यांना पर्यायच नव्हता. आमचेच राज्य जन्मभर टिकणार आहे, अशाप्रकारे त्यांनी राज्य करायला सुरुवात केली.
भाजप जेंव्हा सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला तेंव्हा काँग्रेसने डिव्हाईड अॅन्ड रूल पॉलिसी वापरली. भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, असा प्रचार करत देशामधी उभी फळी करण्याचा प्रयत्न केला. जाती आणि धर्मावरुन आमच्यावर आरोप करणाऱ्यांनो तुम्हीच जाती आणि धर्माचे राजकारण केले, असा आरोप पंकजा मुंडेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला.