महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उपराजधानीत कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद नाही, १३४ जण कोरोनामुक्त - नागपूर कोरोना अपडेट

नागपूर जिल्ह्यात सातत्याने तिसऱ्या दिवशी शहरात तर ग्रामीण भागात मागील सात दिवसात एकही मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 8 हजार 857 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 39 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 26 तर ग्रामीण भागात 13 बाधित रुग्ण आढळले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात तसेच बाहेर जिल्ह्यातील कोरोनाने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेच 134 जणांपैकी शहरात 96 तर ग्रामीण 38 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 228 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 679 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.

zero corona deaths reported in nagpur
zero corona deaths reported in nagpur

By

Published : Jun 21, 2021, 6:14 AM IST

नागपूर - जिल्ह्यात सातत्याने तिसऱ्या दिवशी शहरात तर ग्रामीण भागात मागील सात दिवसात एकही मृत्यूची नोंद नाही. उपराजधानी मेडिकल हब असल्याने यासोबत मोठ्या प्रमाणात रुग्ण बाहेर जिल्ह्यातून किंवा लगतच्या राज्यातून येतात. यात एकही रुग्ण मागील 24 तासात दाखल झाला नाही. यासोबत मृत्यूही नसल्याने शहर ग्रामीण आणि बाहेर जिल्ह्याच्या तिन्ही रकान्यात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच झालेली ही नोंद आणि रुग्णसंख्या हजारच्या आत आल्याने आनंददायी क्षण आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 8 हजार 857 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 39 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये शहरी भागात 26 तर ग्रामीण भागात 13 बाधित रुग्ण आढळले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात तसेच बाहेर जिल्ह्यातील कोरोनाने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेच 134 जणांपैकी शहरात 96 तर ग्रामीण 38 जण कोरोना मुक्त झाले आहे. यात 228 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 679 रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये आहे.

रुग्णसंख्या हजारच्या आत..

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 907 वर आलेली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 761 जण रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे. यातून 4 लाख 66 हजार 837 जण हे कोरोनातून बरे झाले आहे. यात मृत्यूचा आकडा हा 9017 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेट हा 97.92 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.

सहा जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू नाही..

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 242 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 138 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 2 जण हे कोरोनाने दगावले आहे. तेच नागपूर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यात एकही मृत्यूची नोंद नाही. यात बाधितांच्या तुलेनेत 104 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.4 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 0.84 वर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details