नागपूर - शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणा एमआयडीसी परिसरात अज्ञात आरोपींनी तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. सोहनकुमार विजय प्रसाद असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहार येथील रहिवासी होता. सोहनच्या खून प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
अज्ञात आरोपींकडून तरुणाचा खून;हिंगणा एमआयडीसी परिसरातील घटना - nagpur latest murder news
बिहारचा रहिवासी असलेल्या सोहनकुमार या तरुणाचा हिंगणा एमआयडीसी परिसरात कैंचीने वार करुन खून करण्यात आला. याप्रकरणी पळून गेलेल्या अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणा तालुक्यातील एमआयडीसी परिसरात प्रियदर्शनी कॉलेज जवळ रात्री उशिरा ही घटना घडली. सोहनकुमार त्या परिसरात आला आसताना अज्ञात आरोपीने कैचीने गळयावर वार त्याचा खून केला आहे. मृताला ट्रॅक्टर कंपनी परिसरात टायगर नावाने ओळखले जायचे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोहनकुमारचा खून कुणी आणि कोणत्या कारणाने केला या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असल्याने ही घटना घडतांना कुणी बघितली का या संदर्भात देखील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे.