नागपूर - शहरात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकात हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नागपुरात महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखवले काळे झेंडे - प्रदेश प्रवक्ता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची एक ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू आहे. शुक्रवारी या यात्रेचे नागपुरात आगमन झाले. आज मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यानंतर ही यात्रा भंडारा शहराच्या दिशेने निघाली होती. यावेळी सीए मार्गावर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेडे दाखवले.

एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा सुरू आहे. शुक्रवारी या यात्रेचे नागपुरात आगमन झाले. आज मुख्यमंत्र्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यानंतर ही यात्रा भंडारा शहराच्या दिशेने निघाली होती. यावेळी सीए मार्गावर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेडे दाखवले. काँग्रेस कार्यकर्ते असा प्रकार करणार असल्याची पूर्व कल्पना पोलिसांना होती. म्हणूनच रात्री उशिरा प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढेंसह अनेक काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. धरपकड करून देखील आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या महाजन आदेश यात्रेला काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या प्रकरणी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मीळत आहे.