महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पॉर्न फिल्म बघून शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू - youth died during sex

मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला

शारीरिक संबंध ठेवत असताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू
शारीरिक संबंध ठेवत असताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू

By

Published : Jan 8, 2021, 9:20 AM IST

Updated : Jan 8, 2021, 10:11 AM IST

नागपूर- मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉज वर घडली आहे. मृत २७ वर्षीय तरुण इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार होता, अशी माहिती पुढे आली आहे.

खुर्चीवरून पडल्याने बसला गळफास-

या प्रकरणाची माहिती अशी, की मृत तरुण आणि त्याची २० वर्षीय मैत्रीण गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंधात आहेत. गुरुवारी दोघे मिळून खापरखेडा परिसरात असलेल्या महाराजा लॉज वरील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शाररिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने शाररिक संबंध ठेवण्याच्या प्रयत्नात दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले होते. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवती सुद्धा अवळण्यात आली होती. मात्र, तरुणी बाथरुमला गेल्यानंतर तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला आणि त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला. त्यामुळे गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.

या घटनेपूर्वी बाथरुमला गेलेली तरुणी ज्यावेळी बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती, त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात लॉज सहज होतात उपलब्ध

नागपूर जिल्ह्याचा व्याप फार मोठा असल्याने पर्यटनाचे विविध स्थळ विकसित झाले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या प्रेमी युगुलांसाठी सहज रित्या लॉजवर रूम उपलब्ध असतात. कोणतीही शहानिशा न करता लॉज व्यवस्थापक देखील थोड्या पैशांसाठी कोणत्याही आयडी प्रूफ शिवाय रूम उपलब्ध करून देत असतात. या घटनेनंतर पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकांसह तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

Last Updated : Jan 8, 2021, 10:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details