नागपूर -नागपूर शहरातील अतिशय उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ येथून सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन आरोपीं संगनमत करून एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर त्या तरुणीवर कळमना येथे नेऊन सामूहिक बलात्कार ( Young Woman Abducted and Gang Raped ) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पिडीत तरुणी ही गाण्याच्या शिकवणी वर्गात जात असताना नराधमांनी तिचे अपहरण केले. पीडित तरुणीला त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला, त्यानंतर तरुणीने कळमना पोलीस ठाण्यात जाऊन ( Rape complaint Filed Kalamna police station ) तक्रार नोंदवली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
निर्जनस्थळी नेऊन केला आळीपाळीने अत्याचार -
पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील फेटरी येथील रहिवासी आहे. ती रोज कॉलेज आणि गाण्याच्या शिकवणी वर्गासाठी नागपुरला येत असते. दुपारी ती लहान मुलांची शिकवणी घेतल्यानंतर संध्याकाळी घरी जायची. रोजच्या प्रमाणे आज सकाळी नागपूरला आली. रामदासपेठ भागातून पायी जात असताना दोन आरोपींनी त्या तरुणीचे अपहरण करून तिला कळमना परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.