नागपूर - क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यशोधरा नगर परिसरात ही घटना घडली असून मोहम्मद अन्सारी असे मृताचे नाव आहे. मित्रांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नागपुरात खुनाचे सत्र सुरूच ; शुल्लक कारणावरून युवकाची हत्या - नागपूर गुन्हे वृत्त
क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यशोधरा नगर परिसरात ही घटना घडली असून मोहम्मद अन्सारी असे मृताचे नाव आहे. मित्रांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणातील तिघेही अद्याप फरार आहेत.
दिवसेंदिवस जिल्ह्यात खुनांचे सत्र वाढत आहे. क्षुल्लक कारणावरून गोळीबार, वार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना ताज्या असतानाच मित्रामित्रांमधील वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मोहम्मद अन्सारी हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो नियमित कामावर जात असताना तीन मित्र अरविंद नगरमधील बर्फाच्या कंपनीजवळ आले. यावेळी अन्सारीला तीनही आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर एका धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला.
याच रस्त्याने अन्सारीचा एक मित्र येत होता. त्याने हा प्रकार पाहिला. त्याने तत्काळ मोहम्मदला रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच मोहम्मद अन्सारीचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्ला करणारे तीनही आरोपी फरार आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी तपास सुरू केलाय. तसेच या प्रकरणी तीनही अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक के.पाठक यांनी दिली.