नागपूर - शिवसेनाच्या दसऱ्या मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे तिथे जनतेने वरपास केलेल्या आणि बेईमानीने सत्तेत आलेले मुख्यमंत्री हे गरळ ओकताना दिसून आले असा पलटवार राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून माध्यमांसमोर बोलताना केला. दसरा मेळाव्यातुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यानी सरकार पडण्याच्या पर्यंत करत आहे म्हणत भाजपावर केलेल्या टीका केली. जेव्हा सरकार पडेल तेव्हा कळणार नाही असे उत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचेही टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांशा -
जनतेने भाजपला नाकारले नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले आहे, तर शिवसेनेला वरपास केले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कदाचित विस्मरण झाले आहे. भाजप लढलेल्या 70 टक्के जागा जिंकल्या आहे, शिवसेना 45 टक्के जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेनेना जतनेशी बेईमानी करत सत्तेत आली आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांशा होती, त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी कोणा कोणाला डाववले याचा पाढा वाचला. पण हा भाबळेपणाचा मुखवटा काढला पाहिजे. मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती ती पूर्ण केली. त्यात काही चुकीचे नाही, पण ते लपवत तत्वज्ञान उभे करणे हे मात्र चुकीचे असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
एवढेच होते तर शिवसैनिकांला मुख्यमंत्री करता आले असते -
बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल हा दिलेले शब्द पूर्ण करायचा होता तर एखाद्या शिव सैनिकालाही मुख्यमंत्री करता आले असते. दिवाकर रावते, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मान्यवर मंडळी शिवसेनेत होती. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे न्हवते तर नारायण राणे याना पक्षातून का बाहेर जावे लागले, त्यांना पक्षप्रमुख बनायचे नव्हते. राज ठाकरे यांना सेवेतून का बाहेर पडावे लागले. तुमची महत्वकांक्षा होती ती पूर्ण केली पण आम्हाला दोष देणे थांबवा. तो मुखवटा आता काढून फेका... महाराष्ट्राचा बंगाल करायचाय म्हणजे लोकांचे मुंडके छटायचे आहे का? बंगालमध्ये युनियन बाजी आणि खंडणीबाजीमुळे एक उद्योग टिकला नाही, एकेकाळी कलकत्ता देशाची आर्थिक राजधानी होती, आज तिथली अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलले त्याची हातपाय, मुनके छाटून फासावर लटकवायचे आहे का? असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजाप मात्र रक्ताचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला. कोणाचे काहीही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू. संघराज्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलून टाकण्याचे मनसुबे बोलुन दाखवले. पण आम्ही ते संविधान बदलू देणार नाही. संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा काही पक्ष आणि कम्युनिस्ट डाव्या विचारसरणीच्या लोकांना घेऊन करत आहे ते मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही.
ठाकरे सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भष्ट्र सरकार -
ईडी, सीबीआय ही उच्च न्यायालयाने आणली आहे, भाजपांनी आणली नाही. महाराष्ट्राच्या सर्वात भ्रष्ट सरकारचे नेतृत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे. याची इतिहासात भष्ट्र सरकार म्हणून नोंद होईल हे लक्षात ठेवा. या सरकारचा खंडणी वसुली हा एकच अजेंडा असल्याची घणाघाती टीकाही केली. राज्याचे प्रमुख म्हणून असतांना आयकर विभागाच्या धाडीत जे समोर आले ते पाहता झोप यायला नको. कारण त्यात जे उघड आले त्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात दलाली सुरू आहे. काही मंत्र्यांनी तर या वसुलीसाठी साफ्टवेअर बनवले आहे, त्या माध्यमातून कोणाकडून किती वसुली करायची हे काम चालत आहे, यास्तरावर पोहचली दलाली पाहता ईडी आणि सीबीआय येणारच असेही फडणवीस म्हणालेत. ज्यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना भय असायला पाहिजे.