नागपूर - एखादा चांगला विषय असेल, तर आपण बोलायला पाहिजे. ते राणांचे रडगाणे किती दिवस गायचे, खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम नाही, ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्ज पणा करतच राहणार, अशी बोचरी टीका खासदार नवनीत राणांवर महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली ( Yashomati Thakur Criticized Navneet Rana ) आहे. ते नागूपरात काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
Yashomati Thakur : नवनीत राणांनी बेशर्मीची हद्द गाठली; यशोमती ठाकूरांची बोचरी टीका - यशोमती ठाकूर नवनीत राणा
राणांचे रडगाणे किती दिवस गायचे, खूप सारे काम आहेत करायला. ज्यांना काम नाही, ज्यांना काम करायचे नाही ते बेशरम आणि निर्लज्ज पणा करतच राहणार, अशी बोचरी टीका नवनीत राणांवर यशोमती ठाकूर यांनी केली ( Yashomati Thakur Criticized Navneet Rana ) आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, वेडी आहेत ती आपण त्यापासून दूर रहावे. मीडियामध्ये येण्यासाठी ते हे सगळं करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शनी म्हटल्याबाबत विचारले असता, जो दुसऱ्याचा मान सन्मान करु शकत नाही. तो स्वत:चाही कधीच मान सन्मान करत नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आपण ज्या देशात राहतो तिथे तिरंग्याचा सन्मान महत्वाचा आहे. सगळ्यांनी एकत्र रहावे. सगळ्यांना सगळ्या गोष्टींचे स्वातंत्र्य आहे. निवडूण यायचे एक प्रकारे हा तमाशा करायचा. कोणालाही काहीही बोलायचे. बेशर्मीची हद्द गाठही आहे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी राणांवर सडकून टीका केली आहे.