महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विद्या वेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी नागपुरातील आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - नागपूर आंदोलन बातमी

नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात डीन कार्यालयासमोरर आज या निवासी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यात नागपूरसह चार ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असून, त्या ठिकाणीही संपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Ayurvedic resident doctors
आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

By

Published : Oct 7, 2020, 4:41 PM IST

नागपूर - नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी विद्या वेतनात वाढ करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी अनिश्चितकालीन कामबंद आंदोलन पुकारले आहे. सर्व डॉक्टर उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -एच-१बी व्हिसाच्या नव्या नियमाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे होणार नुकसान

वैद्यकीय ( mbbs ) आणि दंत ( dental ) च्या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात नुकतंच शासनाने वाढ केली आहे. मात्र, ते करताना फक्त आयुर्वेदिकच्या निवासी डॉक्टरांना ती वाढ लागू केलेली नाही. त्यामुळे आयुर्वेदिक निवासी डॉक्टर गेले अनेक दिवस या दुजाभावाबद्दल राज्य सरकारकडे नाराजी व्यक्त करत होते. शिवाय या आयुर्वेदिक डॉक्टरांना एप्रिल महिन्यापासून विद्यावेतनही मिळालेला नाही.

त्यामुळे सरकारच्या दुजाभावामुळे नाराज असलेल्या आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू करत अनिश्चित काळासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात डीन कार्यालयासमोरर आज या निवासी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यात नागपूरसह चार ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असून, त्या ठिकाणीही संपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details