महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या अफ्रिकन सफारीचा कामाला वेग येणार....

शेवटच्या टप्प्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जी नाईट सफारी हे मोठ्या जंगलामध्ये आपल्याला अनुभवता येते. तेच भविष्यात हज सफारी गोरेवाडा मध्येही बघायला मिळेल. संध्याकाळी सहा ते अकराच्या दरम्यान गोरेवाडा पार्कमध्ये ही अनुभवता येणार आहे. यात दिवसभर काम केल्यानंतर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी सुद्धा एक पर्याय नाईट्स सफारीच्या माध्यमातून तयार होणार आहे. याला आणखी काही वर्षे लागणार असले तरी प्रस्तावित टप्प्यांमध्ये नाईट सफाररी सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा तसेच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानच्या शोभेत भर वाढवणारी असणार आहे.

work on african safari at gorewada zoo will  start soon in nagpur
गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या अफ्रिकन सफारीचा कामाला वेग येणार

By

Published : Jul 11, 2022, 7:00 PM IST

नागपूर - बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे नागपूरच नाही तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकासाठी सुद्धा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. अनेक वर्ष रखडून राहिलेला प्रकल्पाचे 26 जानेवारी 2021 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उदघाटन झाले. पण गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय असे नाव असून चालणार नाही तर याला आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान बनवण्यासाठी तसे प्रयत्न केले जात आहे. यातच दुसऱ्या टप्प्याच्या अफ्रिकन सफारीच्या कामासाठी यंदाच्या वर्षात वेग येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील 100 कोटीच्या अफ्रिकन सफारीचा कामाला सुरुवात -यात पूर्वी असलेल्या छोट्या प्राणी उद्यानाची ही संकल्पना आता बदलत गेली आहे. यात आता गोरेवाडा सारख्या प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जंगली प्राण्यांना मोठ्या आकाराच्या पिंजऱ्यातुन नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून दिला जात आहे. यात आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान बनवताना त्याच धर्तीवर काही दुर्मिळ प्राणी हे भारतीय सफरीत पाहायला मिळत आहे. सुरवातीला 65 कोटी त्यानंतर हळू हळू अश्या 115 हेक्टरसाठी सुम्रे 155 कोटीचा निधी उपलब्ध झाल आहे. यात बरेच काम झाले. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील 100 कोटीच्या अफ्रिकन सफारीचा कामाला सुरुवात होणार असून 100 कोटीला मंजुरी मिळाली असून जंगलातील प्राणी या उद्यानात पाहायला मिळणार आहे.


अफ्रिकन सफरीच्या कामाला येईल आता वेग -अफ्रिकन सफारी मध्ये 33 प्रकारचे अफ्रिकन प्राणी असणार आहे. यामध्ये झेब्रा जिराफ, सिह, चिता, गोरिला, चिंपंझी, आफ्रिकन हायना अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी अफ्रिकन सफारी मध्ये नागरिकांना पाहायला मिळणार आहे. या सोबतच एकीकडे भारतीय सफारी तर दुसरीकडे अफ्रिकन सफारी भविष्यात नागरिकांसाठी आकर्षित करणारी ठरणार आहे. अफ्रिकन सफारीसाठी दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यात एकूण 1941 हेक्टर पैकी 65 हेक्टरवर अफ्रिकन किंवा प्राणी उद्यानमध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहे. पण या ठिकाणी त्या प्राण्यांना अपेक्षित असेच वातावरण झाड किंवा अन्य बाबीची उभारणी करणार आहे.


यात डीप टाइम ट्रेन आगळा वेगळा अनुभव देणारी ठरेल -पुढील टप्प्यात डीप टाईम ट्रेन वेगळा अनुभव देणारा उपक्रमही यात प्रस्तावित आहे. यात काळाची सफर घडणार असून चित्रपटाच्या माध्यमातून ती साकारली जाणार आहे. छोट्या स्वरूपात चित्रपटात मानवी उत्पत्ती पासून म्हणजे पृथ्वीवरील मानव निर्मिती ते आतापर्यंतचा कालखंड या चित्रपटाच्या माध्यमातून उतरणार आहे. कालांतराने होत गेलेले बदल, जुरासिक पार्क असो की अन्य मानवी उत्क्रांतीतील महत्त्वाच्या घडामोडी या लघुपटात साकारल्या जाणार आहे. सध्या प्रस्तावित असून यात अनेक बदल होईल अशी अपेक्षा आहे.

बटरफ्लाय बर्ड ही वेधणार लक्ष -बटरफ्लाय, बर्ड पार्क सुमारे 10 हेक्टरवर असेल तेच 45 हेक्टर बायोपार्क असेल. बटरफ्लाय पार्कमध्ये विविध प्रकारचे फुलपाखरे पाहायला मिळणार आहे. तसे रेपटाइल्स फ्रॉक छोटे छोटे छोट, छोटे किडे, काही लहान प्राण्याचे अवशेष असणार आहे. माणूस कसा तयार झाला आपले पूर्वज कसे होते. माकडापासून माणसाची निर्मिती झाली का या सगळ्यांची उत्तर या बायोपार्कच्या माध्यमातून नागरिकांना पाहायला मिळणार आहे.पण त्यासाठी अजून प्रतीक्षा असणार आहे. यासोबतच काही फिश अन्य बाबीही पाहायला मिळणार आहे.


नाईट सफारी असेल महत्वाचा टप्पा -यात शेवटच्या टप्प्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जी नाईट सफारी हे मोठ्या जंगलामध्ये आपल्याला अनुभवता येते. तेच भविष्यात हज सफारी गोरेवाडा मध्येही बघायला मिळेल. संध्याकाळी सहा ते अकराच्या दरम्यान गोरेवाडा पार्कमध्ये ही अनुभवता येणार आहे. यात दिवसभर काम केल्यानंतर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी सुद्धा एक पर्याय नाईट्स सफारीच्या माध्यमातून तयार होणार आहे. याला आणखी काही वर्षे लागणार असले तरी प्रस्तावित टप्प्यांमध्ये नाईट सफाररी सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा तसेच गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानच्या शोभेत भर वाढवणारी असणार आहे.

सध्याचे भारतीय सफरीतील आकर्षण -भारतीय सफारीत यात 7 बिबट, 6 अस्वल, 14 निलगाई, चार चितळ आहे, यातच आता नव्याने काही प्राण्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये वाघ, अस्वल आणि, बिबट या प्राण्यांसाठी 25 हेक्टर पिंजरा तयार करण्यात आला आहे. हरणासाठीचा पिंजरा 45 हेक्टर क्षेत्रफळावर आहे. यासोबत पर्यटनासाठी बंद बसमधून काचेतून वन्य प्राणी पाहण्याचा सोय उपलब्ध करून दिली आहे.

आंतरराष्ट्रीय उद्यान करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच -यात गोरेवाडा येथे पांढरे काळवीट हे नॅशनल ज्यू लॉजिकल पार्क दिल्ली येथून आणले आहे. त्यात नर आणि मादी असा दोन्हीचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही पाहता येणार नाही असे हे पांढरे काळवीट आहेत. यात हरणाच्या प्रजातीतील जे काळवीट दिसायला पांढरे असले तरी जेनेटीकल म्युटेशन झालेल्या बदलांमुळे ते रंगहीन झाले आहे. यात हे पांढरे हरीण सुद्धा इतर हरणा प्रमाणेच आहे. यात 14 पांढरे हर, 8 हरीण, 3 सांबर आणि 18 ढेकर हे सुद्धा यात आणण्यात आले असून आकर्षण ठरत आहे. पण यात नर हरीण हा काळसर रंगाचाच असतो हे विशेष आहे. तसेच मणिपूर राज्यातून दुर्मिळ कुठेही न मिळणारा किंवा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणून यात 8 संगाई हरीण आणण्यात आले होते. सोबतच 4 बंगालचे लांडगे आणि 3 कोल्हे तसेच 4 सांबर असे 19 नविम प्राणी मागील वर्षात दाखल झाले आहे. याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान होण्याच्या दिशेने गोरेवाडा प्रशासनाकडून नावीन्य आणि वेगळे प्राणी आणून वन्य प्रेमींना वेगळा अनुभव देण्याचे काम गोरेवाडा प्राणी उद्यानाकडून केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details