महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

WOMAN'S DAY SPECIAL : जाणून घ्या, विदर्भातील एकमेव महिला संचालित रेल्वे स्टेशनची माहिती - महिला संचालित रेल्वे स्टेशन

अजनी रेल्वे स्टेशनवर ( women's day celebrated in Ajni Junction ) महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अजनी रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक पदावर महिलाराज आहे. अतिशय कुशलतेने महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांची मत्तेदारी मोडीत काढली आहे.

women's day 2022 celebrated in Ajni Junction
WOMAN'S DAY SPECIAL

By

Published : Mar 8, 2022, 1:28 PM IST

नागपूर -विदर्भातील एकमेव आणि महाराष्ट्रातील दुसरे महिला कर्मचारी संचालित रेल्वे स्टेशन म्हणून ओळख निर्माण केलेल्या अजनी रेल्वे स्टेशनवर ( women's day celebrated in Ajni Junction ) महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अजनी रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक पदावर महिलाराज आहे. अतिशय कुशलतेने महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांची मत्तेदारी मोडीत काढली आहे. चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वे स्टेशनची जबाबदारी ही महिलांच्या खांद्यावर देण्यात आली होती. तेव्हापासून अतिशय कुशलतेने या महिला कर्तव्यपूर्ती करत आहेत.

या रेल्वे स्थानकावर महिला राज

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण नागपूरसह विदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा किंचितही कमी नाही, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्ववाचा ठसा उमटवत आहे. महिलांना सम- समान संधी दिली जावी, अश्या गप्पा केवळ महिला दिनाच्या निमित्ताने मारल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात महिलांना डावलण्याचे काम केलं जातं. हे कटू सत्य आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात एक असे रेल्वे स्टेशन आहे. ज्याचा संपूर्ण कारभार हा महिलांकडून बघितला जातो. गेल्या वर्षांपासून महिला समर्थपणे अजनी रेल्वे स्टेशनची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

2018 साला पासून अजनीत महिलाराज -

मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमध्ये अजनी रेल्वे स्टेशन जास्त समावेश होतो. 2018 साली तत्कालीन डीआरएम अश्विनी गुप्ता यांच्या कार्यकाळात अजनी रेल्वे स्टेशनचा संपूर्ण कारभार महिलांच्या हवाली करण्यात आला. तेव्हापासून बिनदिक्कतपणे महिला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत.

अजनी स्टेशनवर 27 महिला कर्मचारी -

8 मार्च 2018 साली जेव्हा अजनी रेल्वे स्टेशन महिलांच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा पासून स्टेशन प्रबंधक म्हणून माधुरी चौधरी या समर्थपणे अजनी रेल्वे स्टेशनची जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली मुख्य बुकिंग अधिकारी छाया काळे यांच्यासह 9 बुकिंग अधिकारी, 2 पॉईंटमॅन,7 सफाई कर्मचारी,5 सिग्नल आणि टेली कम्युनिकेशन कर्मचारी आणि 5 आरपीएफ स्टाफ कार्यरत आहेत.

भारतात केवळ तीनच महिला रेल्वे स्टेशन -

संपूर्ण भारतात केवळ तीनच रेल्वे स्टेशन असे आहेत ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारीचं कार्यरत आहेत. त्यापैकी दोन रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रात आहे पहिले रेल्वे स्टेशन म्हणजे अजनी रेल्वे स्टेशन तर दुसरे मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशन आणि तिसरे म्हणजे गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्टेशन आहे.

हेही वाचा -Budget Session LIVE Update : विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details