महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Wife Killed Husband In Nagpur : पत्नीने नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला; पोस्टमॉर्टम अहवालातून हत्येचा खुलासा - Husband faked suicide case

दारुच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या ( Faking suicide by husband ) केल्याचा बनाव ( Drunken husband killed by wife ) पत्नीने रचला. मात्र मृतकाच्या शवविच्छेदन अहवालाने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सिद्ध केले. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी महिलेला ( Wife Killed Husband In Nagpur ) अटक केली.

Drunken husband killed by wife
Etv Bhनागपुरात पत्नीकडून दारुड्या पतीची हत्याarat

By

Published : Aug 2, 2022, 7:19 PM IST

नागपूर- दारुच्या नशेत नवऱ्याने स्वतःच स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या ( Faking suicide by husband ) केल्याचा बनाव ( Drunken husband killed in Nagpur ) रचलेल्या पत्नीचे पितळ उघडे पडले ( Husband killer wife exposed ) आहे. मृतकाच्या शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली ( Wife arrested in case of husband murder )आहे. ग्यानी मनराखन यादव असे मृतकाचे नाव आहे तर राणी यादव असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

मृतक ग्यानी मनराखन यादव

नवऱ्याचे डोके शिलाई मशीनवर आपटले- दोन दिवसांपूर्वी ही घटना नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाजपेयी नगरमध्ये ही घटना घडली होती. ग्यानी यादव हे रोज रात्री दारु पिऊन येत असल्याने त्यांच्यात रोज भांडण व्हायची. त्यामुळे वैतागलेल्या राणी यादवने नवऱ्याचे डोके शिलाई मशीनवर आपटून हत्या केली. मात्र, त्यानंतर आरोपी महिलेने नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता.


आत्महत्या नसून हत्या; शवविच्छेदन अहवालात उघड - शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्याला ईजा झाली असून गळा आवळ्याचा खुणा आढल्याने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा अहवाल शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली असताना तिने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

हेही वाचा- Pune Murder : चारित्र्यावर संशय! अल्पवयीन मुलीसमोरच केला पत्नीचा खून

ABOUT THE AUTHOR

...view details