नागपूर - शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका महिलेच्या दुचाकीला मागून आलेल्या स्कार्पियो चारचाकीने जोरदार धडक दिली. यामुळे संबंधित महिला थेट उड्डाणपूलावरून खाली कोसळली असून तिचा मृत्यू झाला आहे.
चारचाकीच्या धडकेने महिला उड्डाणपूलवरून खाली...चालक फरार - sadar police station
शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला आहे. एका महिलेच्या दुचाकीला मागून आलेल्या चारचाकीने जोरदार धडक दिली. यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

चारचाकीच्या धडकेने महिला उड्डाणपूलवरून खाली...चालक फरार
मंजुषा मारुती दलाल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ती एका खासगी रूग्णालयात परिचरिका म्हणून कार्यरत होती
मंजुषा दलाल दुचाकीवरून रुग्णालयात जात होत्या. स्कार्पियो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती समजताच संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मंजुषा यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातासाठी कारणीभूत असलेला चालक घटनेनंतर गाडी सोडून पळून गेला आहे. अद्याप पोलीस त्याचा शोध घेत आहेत.